gtag('config', 'AW-414190939'); MSD Blogs for you - The Best Blogs In Marathi Language.: 2021 Your Amazing Page Title

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

This too shall pass.

    This Too Shall Pass...



👉हे क्षण हीं निघून जातील !!!

एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल.      
   अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.  
        बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व  कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले. विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.  हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला त्या अंगठीची आठवण आली अन् ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते ,  
          " *This too shall pass* " 
          म्हणजे   
        " *हाही क्षण निघून जाईल"* 
केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले , सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला असे समजून ते परतले.          राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.            
 विजयाचा जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानाने पाहिले की , महाराज कुठेही अति-उत्साहित न होता शांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले ,            " महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे. " राजा म्हणाला, " नाही , आता मला बुद्धाचा अनित्यता वादाचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.

परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही* *राहात नाही , दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले* *आहे.म्हणून दुःखात खचू नये अन्  सुखात नाचू नये."

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

Truth of life quotes in Marathi.



आदर्श जीवन जगण्यासाठी...


LIFE IS JOURNEY.



 👉 (०१) चूक झाली तर मान्य करा. 
👉 (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.
 👉 (०३) चांगल्या कामाची स्तुती करा. 
👉 (०४) आभार मानायला विसरू नका.
 👉 (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
 👉 (०६) सतत हसतमुख रहा.
 👉 (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. 
👉 (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका. 
👉 (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा. 
👉 (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
 👉 (११) कृती पुर्व विचार करा. 
👉 (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका. 
👉 (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा. 
👉 (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या. 
👉 (१५) नेहमी सत्याची कास धरा. 
👉 (१६) इतरांना चांगली वागणूक द्या. 
👉 (१७) विचार करून बोला. 
👉 (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
 👉 (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.
 👉 (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका. 

कुटुंब टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,

 आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली ● स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली ● मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला ● झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला ● कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली ● कबुतर आपल्याच विचारात मश्गुल ● मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली ● कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं ★ पारधी येणार हेच विसरून गेलं ★ पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला •कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. 【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】 मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं
_मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते. अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते. सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा... हा जन्म पुन्हा नाही...😊 विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका.

🙏🙏 कृपया वेळ काढून नक्की वाचा. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....

 👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि 👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच.. माणसाच्या जीवनात "हितचिंतकांची" आणि "निंदकांची" आवश्यकता आहे.... आयुष्यात असे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........ कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. 🐾 
👄बोलायच्या आधी….❕
 👂ऐकायला शिका............❗ 
🎁खर्च करायच्या आधी….❕
 💰कमवायला शिका.......❗
 📝लिहायच्या आधी ……❕
 😇 विचार करायला शिका....❗ 
हार मानण्याआधी.....❕
 👉 प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी .....❗ 
👉 जगायला शिका......❕ 
👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका, कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. 

🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे..... आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ... 
" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"
 1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत 
2:-"समाज" स्मशाना पर्यंत 
3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत फक्त आणी फक्त *"कर्म"* शेवट l पर्यंत.
 जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,* आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.* यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचे जीवन...


*नक्की वाचा*
 *जन्म* : दूस-याने दिला ...
 *नाव* : दूस-याने ठेवलं ... 
*शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...
 *रोजगार* : दूस-यांनीे दिला ... 
*इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ... 
*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* : दुसरेच घालणार ... 
*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ... 
*आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार... तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!! 
*दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक... आपल्या माणसांना *आठवतात*.
 *धन* इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी... आपल्या माणसांना *विसरतात*. किती विचित्र आहे ना...??  माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं... आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं. 

" T#@nK U ''

Copy Paste ...
Credentials to writter ...


MSD BLOGS!

शनिवार, २७ मार्च, २०२१

Dr. APJ ABDUL KALAM.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम.

Take a step.....
Do it now.....
Never ever give up.....
Till you not achieve it.....


DR. APJ ABDUL KALAM

 डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते.. त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली.. नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की,पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील 'एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग' ला प्रवेश घ्यावा लागतो !..मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले !..खुप रडले!.. परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले !.. नंतर एयरोमॉटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली ,त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते !..

त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची !..  त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या!.अर्ज आठ !.. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर !..ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!. डॉ.  कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली!.. डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे,या निर्णयामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले !..

डॉ. कलाम खुप हताश झाले !..


रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले !.. तेथील स्वामीजींनी सांगीतले, " का ऊदास होतोस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ  नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही !.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल !..


डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!.. दुस-या दिवशी पेपरमधे,"एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे" अशी जाहीरात होती, कुण्या विक्रम साराभाईंची !.. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट !..


ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट!..

एकच जागा !..

यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली !.. दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, "सांगा विमान कुठे घेऊन जायचे?".. विक्रम साराभाई म्हणाले, "आपल्या जवळ विमानच नाहीये ..आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!".. पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे !..


तर मित्रांनो !.. तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !...

कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल !..


 "जीवनात अयशस्वी जरी झालोत 

          तरी निराश होऊ नये 

                 कारण,

         F.A.I.L. चा अर्थ 

    First Attempt In Learning

       असाच आहे..!!


      प्रयत्नांना कधीही 

       शेवट नसतो 

    कारण,

       E.N.D. चा अर्थ

      Efforts Never Dead 

          असाच घेऊयात..!!


     आयुष्यात कोणाकडूनही 

    नकार आला तरी

    खचून जाऊ नये  

  कारण,

     N.O. म्हणजे 

     Next Opportunity

 म्हणून नेहमी आशावादी राहुयात आणि 

जीवनात पुढेच चालत राहुयात..

🙏🙏🙏💐😊💐🙏🙏🙏

Copypaste...


रविवार, ३ जानेवारी, २०२१

Inspirational Thoughts.

Inspirational Thoughts.


Read to Lead.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

RONALDO QUOTE

-------------------------------------------------------------------

१ ✓ जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत..! 

 ✍🏼 नारायण मूर्ती

-------------------------------------------------------------------

 २✓ जर तुमच्या कडे दोन  रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या...

  रोटी तुम्हाला जगण्यास मदत  करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे  कसे ते शिकवेल..!

✍🏼 स्वामी विवेकानंद

-------------------------------------------------------------------

 ३✓ यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; 

हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय..!

✍🏼 विश्वनाथन आनंद

-------------------------------------------------------------------

४✓ नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे..!

✍🏼 धीरूभाई अंबानी

-------------------------------------------------------------------

 ५✓पैसा हा खतासारखा आहे.

 तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो..!

✍🏼 जे. आर. डी. टाटा

-------------------------------------------------------------------

६✓ पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल..!

✍🏼 डाॅ. अब्दुल कलाम

-------------------------------------------------------------------

 ७✓चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो..!

✍🏼 बिल गेट्स

-------------------------------------------------------------------

८✓ मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता..!

✍🏼 कल्पना चावला

-------------------------------------------------------------------

९✓ कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत

बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या बदलाचा भाग व्हा..!

✍🏼 बराक ओबामा

-------------------------------------------------------------------

१०✓ माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच..!

✍🏼 आयझॅक न्यूटन

-------------------------------------------------------------------

११✓ मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस"  होणे; हे त्याचे यश आहे..!

✍ सर्वपल्ली राधाकृष्णन

-------------------------------------------------------------------

Inspirational Thoughts.
 ------------------------------------------------------------------