gtag('config', 'AW-414190939'); MSD Blogs for you - The Best Blogs In Marathi Language.: Share Market.. Your Amazing Page Title

रविवार, २० डिसेंबर, २०२०

Share Market..


शेअर मार्केटची दुनिया...
SHARE MARKET TRADING SCREEN

शेअर मार्केट.. असेच youtube वर ब्राउझ करताना शेअर मार्केट बद्दल व्हिडिओ समोर आली शेअर मार्केट मधे गुंतवणूक करून तुम्ही करोडपती होऊ शकता. मी सहज उस्तुकता म्हणून व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. मला वाटतंय की काही १५ मिनिटांची ती व्हिडिओ असेल, ती व्हिडिओ पाहून मला शेअर मार्केट विषयी आणखी जाणून घेण्याची इच्छा झाली. मग मी आणखी त्यासंबधीत व्हिडिओ पहिल्या, ब्लॉग्ज वाचले, पाहतो तर खूप माहिती इंटनेटवर उपलब्ध आहे. तेव्हा मला समजल की यात तर खूप लोक गुंतवणूक करतात आणि त्यात काही सफल होतात तर काही असफल, म्हणजेच काही लोक पैसे कमवतात तर काही गमावतात. अशी पण काही लोक आहेत त्याने खूप पैसा कमावला आणि अशी पण लोक आहेत ज्याने खूप पैसा गमावला. यावरून समजल की यात आपण पैसा कमवू पण शकतो आणि गमावू पण शकतो.
आता हेही समजल की जमवणे किंवा गमवणे है आपण खरेदी केलेल्या शेअर कामगिरीवर वर अवलंबून आहे. 
मग मी विचार केला की आपण यात गुंतवणूक करू शकतो का आणि किती रुपयांपासून सुरू करू शकतो हे मी शोधू लागलो, आणि मला समजल की आपण कितीही रुपयांपासून सुरुवात करू शकतो. आता तर डिस्काउंट ब्रोकर आल्यापासून तर आपण घर बसल्या काही मिनिटात आपला डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट तोही कमीतकमी फी मधे खोलू शकतो. एक असा काळ होता कि जेव्हा आपणास डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट चालू करण्यास फुल टाईम ब्रोकर कडून हजारो रुपये घेतले जात होते. पण डिस्काउंट ब्रोकर ने मार्केट मधे येऊन मोठा बदल घडवून आणला. कोणीतरी बोलून गेलाय ना....
रिस्क है तो इस्क है....
परंतु एखाद्या क्षेत्राची पुरेशी माहिती नसताना घेतलेली रिस्क हि इश्क नाही तर ती मोठी रिस्कच आहे. तर पाहिले पूर्ण माहिती घ्या, ज्या क्षेत्रात आंपल्याला काहीतरी मोठ करायचं आहे आणि मग रिस्क घ्या. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा