gtag('config', 'AW-414190939'); MSD Blogs for you - The Best Blogs In Marathi Language. Your Amazing Page Title

गुरुवार, ४ जुलै, २०२४

Boost Your Productivity with These Free AI Tools

In the fast-paced world of digital marketing, staying ahead of the curve requires leveraging the best tools available. Fortunately, there are several free AI tools designed to enhance your productivity and streamline your workflow. Here's a roundup of some of the most effective AI tools you should consider integrating into your digital marketing strategy.

1. Copy.ai
Copy.ai is an invaluable tool for content creation. Whether you need to write blog posts, generate Instagram captions, create marketing emails, or develop other types of content, Copy.ai has got you covered.

Features:
- Generates engaging content quickly.
- Helps with SEO-friendly copy.
- Provides various templates for different content needs.
Link: https://www.copy.ai/

2. Inflect
Inflect is an AI-powered hashtag generator that provides you with effective and popular hashtags to boost your social media posts' visibility.

Features:
- Suggests hashtags based on popularity and relevance.
- Categorizes hashtags into frequent, average, and rare for better targeting.
Link: https://lnkd.in/e7wUE6HG

3. Forms.app
Forms.app's AI Form Generator allows you to create detailed and professional forms quickly, making data collection seamless and efficient.

Features:
- Easy-to-use interface for form creation.
- Customizable templates for various needs.
- AI assistance in form generation.
Link: https://forms.app/myforms

4. vidIQ
vidIQ offers an AI Video Idea Generator that helps YouTube creators come up with engaging video ideas tailored to their channel's niche.

Features:
- Generates video ideas based on your channel's content.
- Helps optimize video titles, tags, and descriptions.
Link: https://lnkd.in/d7fgUkHG

5. Quillbot
Quillbot is a versatile tool for grammar checking, paraphrasing, citation generation, and summarizing content, making it an essential part of your writing toolkit.

Features:
- Advanced grammar checker and paraphraser.
- Citation generator for academic and professional writing.
- Summarizes long texts efficiently.
Link: https://quillbot.com/

6. ContentScale AI
ContentScale AI checks whether content is written by humans or generated by AI, ensuring the authenticity of your content.

Features:
- Analyzes content to detect AI-written text.
- Ensures compliance with content authenticity standards.
**Link**: https://contentatscale.ai/

7. HubSpot CMS
HubSpot CMS is an AI-powered tool for creating and managing websites with ease, making it ideal for marketers looking to establish an online presence quickly.

Features:
- AI assistance in website creation and management.
- User-friendly CMS with a variety of templates.
- Integrates with other HubSpot marketing tools.
Link: https://lnkd.in/eQvv2jm

Conclusion
Incorporating these AI tools into your digital marketing efforts can save you time, enhance your content, and increase your productivity. Explore these tools and see how they can transform your digital marketing journey. 🚀

Enhance your digital marketing journey with these amazing tools! 🚀

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

This too shall pass.

    This Too Shall Pass...



👉हे क्षण हीं निघून जातील !!!

एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल.      
   अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.  
        बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व  कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले. विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.  हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला त्या अंगठीची आठवण आली अन् ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते ,  
          " *This too shall pass* " 
          म्हणजे   
        " *हाही क्षण निघून जाईल"* 
केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले , सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला असे समजून ते परतले.          राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.            
 विजयाचा जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानाने पाहिले की , महाराज कुठेही अति-उत्साहित न होता शांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले ,            " महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे. " राजा म्हणाला, " नाही , आता मला बुद्धाचा अनित्यता वादाचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.

परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही* *राहात नाही , दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले* *आहे.म्हणून दुःखात खचू नये अन्  सुखात नाचू नये."

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

Truth of life quotes in Marathi.



आदर्श जीवन जगण्यासाठी...


LIFE IS JOURNEY.



 👉 (०१) चूक झाली तर मान्य करा. 
👉 (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.
 👉 (०३) चांगल्या कामाची स्तुती करा. 
👉 (०४) आभार मानायला विसरू नका.
 👉 (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
 👉 (०६) सतत हसतमुख रहा.
 👉 (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. 
👉 (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका. 
👉 (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा. 
👉 (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
 👉 (११) कृती पुर्व विचार करा. 
👉 (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका. 
👉 (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा. 
👉 (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या. 
👉 (१५) नेहमी सत्याची कास धरा. 
👉 (१६) इतरांना चांगली वागणूक द्या. 
👉 (१७) विचार करून बोला. 
👉 (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
 👉 (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.
 👉 (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका. 

कुटुंब टिकवणे का महत्वाचे आहे ,,,,

 आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली ● स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली ● मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला ● झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला ● कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली ● कबुतर आपल्याच विचारात मश्गुल ● मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली ● कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं ★ पारधी येणार हेच विसरून गेलं ★ पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला •कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. 【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】 मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं
_मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते. अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते. सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा... हा जन्म पुन्हा नाही...😊 विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका.

🙏🙏 कृपया वेळ काढून नक्की वाचा. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....

 👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि 👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच.. माणसाच्या जीवनात "हितचिंतकांची" आणि "निंदकांची" आवश्यकता आहे.... आयुष्यात असे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........ कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. 🐾 
👄बोलायच्या आधी….❕
 👂ऐकायला शिका............❗ 
🎁खर्च करायच्या आधी….❕
 💰कमवायला शिका.......❗
 📝लिहायच्या आधी ……❕
 😇 विचार करायला शिका....❗ 
हार मानण्याआधी.....❕
 👉 प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी .....❗ 
👉 जगायला शिका......❕ 
👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका, कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. 

🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे..... आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ... 
" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"
 1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत 
2:-"समाज" स्मशाना पर्यंत 
3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत फक्त आणी फक्त *"कर्म"* शेवट l पर्यंत.
 जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,* आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.* यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचे जीवन...


*नक्की वाचा*
 *जन्म* : दूस-याने दिला ...
 *नाव* : दूस-याने ठेवलं ... 
*शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...
 *रोजगार* : दूस-यांनीे दिला ... 
*इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ... 
*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* : दुसरेच घालणार ... 
*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ... 
*आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार... तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!! 
*दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक... आपल्या माणसांना *आठवतात*.
 *धन* इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी... आपल्या माणसांना *विसरतात*. किती विचित्र आहे ना...??  माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं... आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं. 

" T#@nK U ''

Copy Paste ...
Credentials to writter ...


MSD BLOGS!

शनिवार, २७ मार्च, २०२१

Dr. APJ ABDUL KALAM.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम.

Take a step.....
Do it now.....
Never ever give up.....
Till you not achieve it.....


DR. APJ ABDUL KALAM

 डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते.. त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली.. नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की,पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील 'एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग' ला प्रवेश घ्यावा लागतो !..मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले !..खुप रडले!.. परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले !.. नंतर एयरोमॉटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली ,त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते !..

त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची !..  त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या!.अर्ज आठ !.. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर !..ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!. डॉ.  कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली!.. डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे,या निर्णयामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले !..

डॉ. कलाम खुप हताश झाले !..


रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले !.. तेथील स्वामीजींनी सांगीतले, " का ऊदास होतोस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ  नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही !.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल !..


डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!.. दुस-या दिवशी पेपरमधे,"एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे" अशी जाहीरात होती, कुण्या विक्रम साराभाईंची !.. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट !..


ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट!..

एकच जागा !..

यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली !.. दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, "सांगा विमान कुठे घेऊन जायचे?".. विक्रम साराभाई म्हणाले, "आपल्या जवळ विमानच नाहीये ..आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!".. पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे !..


तर मित्रांनो !.. तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !...

कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल !..


 "जीवनात अयशस्वी जरी झालोत 

          तरी निराश होऊ नये 

                 कारण,

         F.A.I.L. चा अर्थ 

    First Attempt In Learning

       असाच आहे..!!


      प्रयत्नांना कधीही 

       शेवट नसतो 

    कारण,

       E.N.D. चा अर्थ

      Efforts Never Dead 

          असाच घेऊयात..!!


     आयुष्यात कोणाकडूनही 

    नकार आला तरी

    खचून जाऊ नये  

  कारण,

     N.O. म्हणजे 

     Next Opportunity

 म्हणून नेहमी आशावादी राहुयात आणि 

जीवनात पुढेच चालत राहुयात..

🙏🙏🙏💐😊💐🙏🙏🙏

Copypaste...


रविवार, ३ जानेवारी, २०२१

Inspirational Thoughts.

Inspirational Thoughts.


Read to Lead.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

RONALDO QUOTE

-------------------------------------------------------------------

१ ✓ जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत..! 

 ✍🏼 नारायण मूर्ती

-------------------------------------------------------------------

 २✓ जर तुमच्या कडे दोन  रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या...

  रोटी तुम्हाला जगण्यास मदत  करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे  कसे ते शिकवेल..!

✍🏼 स्वामी विवेकानंद

-------------------------------------------------------------------

 ३✓ यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; 

हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय..!

✍🏼 विश्वनाथन आनंद

-------------------------------------------------------------------

४✓ नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे..!

✍🏼 धीरूभाई अंबानी

-------------------------------------------------------------------

 ५✓पैसा हा खतासारखा आहे.

 तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो..!

✍🏼 जे. आर. डी. टाटा

-------------------------------------------------------------------

६✓ पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल..!

✍🏼 डाॅ. अब्दुल कलाम

-------------------------------------------------------------------

 ७✓चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो..!

✍🏼 बिल गेट्स

-------------------------------------------------------------------

८✓ मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता..!

✍🏼 कल्पना चावला

-------------------------------------------------------------------

९✓ कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत

बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या बदलाचा भाग व्हा..!

✍🏼 बराक ओबामा

-------------------------------------------------------------------

१०✓ माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच..!

✍🏼 आयझॅक न्यूटन

-------------------------------------------------------------------

११✓ मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस"  होणे; हे त्याचे यश आहे..!

✍ सर्वपल्ली राधाकृष्णन

-------------------------------------------------------------------

Inspirational Thoughts.
 ------------------------------------------------------------------



रविवार, २० डिसेंबर, २०२०

Share Market..


शेअर मार्केटची दुनिया...
SHARE MARKET TRADING SCREEN

शेअर मार्केट.. असेच youtube वर ब्राउझ करताना शेअर मार्केट बद्दल व्हिडिओ समोर आली शेअर मार्केट मधे गुंतवणूक करून तुम्ही करोडपती होऊ शकता. मी सहज उस्तुकता म्हणून व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. मला वाटतंय की काही १५ मिनिटांची ती व्हिडिओ असेल, ती व्हिडिओ पाहून मला शेअर मार्केट विषयी आणखी जाणून घेण्याची इच्छा झाली. मग मी आणखी त्यासंबधीत व्हिडिओ पहिल्या, ब्लॉग्ज वाचले, पाहतो तर खूप माहिती इंटनेटवर उपलब्ध आहे. तेव्हा मला समजल की यात तर खूप लोक गुंतवणूक करतात आणि त्यात काही सफल होतात तर काही असफल, म्हणजेच काही लोक पैसे कमवतात तर काही गमावतात. अशी पण काही लोक आहेत त्याने खूप पैसा कमावला आणि अशी पण लोक आहेत ज्याने खूप पैसा गमावला. यावरून समजल की यात आपण पैसा कमवू पण शकतो आणि गमावू पण शकतो.
आता हेही समजल की जमवणे किंवा गमवणे है आपण खरेदी केलेल्या शेअर कामगिरीवर वर अवलंबून आहे. 
मग मी विचार केला की आपण यात गुंतवणूक करू शकतो का आणि किती रुपयांपासून सुरू करू शकतो हे मी शोधू लागलो, आणि मला समजल की आपण कितीही रुपयांपासून सुरुवात करू शकतो. आता तर डिस्काउंट ब्रोकर आल्यापासून तर आपण घर बसल्या काही मिनिटात आपला डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट तोही कमीतकमी फी मधे खोलू शकतो. एक असा काळ होता कि जेव्हा आपणास डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट चालू करण्यास फुल टाईम ब्रोकर कडून हजारो रुपये घेतले जात होते. पण डिस्काउंट ब्रोकर ने मार्केट मधे येऊन मोठा बदल घडवून आणला. कोणीतरी बोलून गेलाय ना....
रिस्क है तो इस्क है....
परंतु एखाद्या क्षेत्राची पुरेशी माहिती नसताना घेतलेली रिस्क हि इश्क नाही तर ती मोठी रिस्कच आहे. तर पाहिले पूर्ण माहिती घ्या, ज्या क्षेत्रात आंपल्याला काहीतरी मोठ करायचं आहे आणि मग रिस्क घ्या. 



गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

Why We Should Have to Read Books ?


पुस्तके का वाचली पाहिजेत हे सांगणारा सुंदर लेख....

Why We Should Have to Read Books ?

पुस्तकांनी काय शिकवलं?

तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा. उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे. का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल. पुस्तके अत्यंत मोलाची आहेत. त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते. एक *ज्ञानेश्वरी* जरी पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येक ओवीचा अर्थ नव्याने कळतो. आपण मराठी माणसे खरोखर नशीबवान, आपल्याला जसा थोर इतिहास लाभला तशी साहित्याची मोठी परंपराही लाभली.
मी पुस्तके वाचायला सुरुवात केली तेव्हा काय वाचायचं हे ठरवलं नव्हतं. सार्वजनिक वाचनयालात जे समोर येईल ते वाचत गेलो आणि हळहळू मराठी साहित्याचा मोठा खजिना हाती गवसला. सुरुवात झाली होती *पॅपिलॉन* नावाच्या पुस्तकापासून. हेन्री शॅरीयर नावाच्या एका फ्रेंच गुन्हेगाराने हे पुस्तक लिहिलं. हेन्रीला गुन्हेगारी जगतात पॅपिलॉन नावाने ओळखत असत. तो फार मोठा गुन्हेगार नव्हता. पण त्याच्यावर खुनाचा खोटा आळ आला आणि त्याला फ्रेंच गियानामधील कुप्रसिद्ध जेलमध्ये धाडण्यात आलं. तिथे त्याला कठोर कारावास भोगावा लागला. आपल्यावर खोटा आळ टाकणार्‍यांना धडा शिकवायचा, त्यासाठी जेलमधून पाळायचं आणि पुन्हा फ्रान्सला जायचं हे त्याने ठरवलं. त्याचा प्रवास सोपा नव्हता. तरीही अत्यंत जिद्द, धाडसाच्या बळावर तो पळाला. ही सगळी कथा त्याने स्वतः लिहिली आणि रवींद्र गुर्जर ह्यांनी ती मराठीत आणली. ह्या पुस्तकाने शिकवलं की जीवनात केव्हाही अडचणी येऊ शकतात आणि त्याला तोंड द्यायला साहस, दुर्दम्य आत्मविश्वास ह्याची गरज असते. संघर्ष हा दर पावलाला येत असतो आणि त्याला तोंड देत जिद्दीने लढायचं असतं.
साहस आणि दुर्दम्य आत्मविश्वासाचा विषय निघतो तेव्हा सावरकरांचं *''माझी जन्मठेप''* पुस्तक विसरता येत नाही. सावरकरांना दोन जन्मठेपीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. एक जन्मठेप होती २५ वर्षांची. म्हणजे सावरकर ५० वर्षानंतर जेलमधून बाहेर येणार होते. थोडक्यात जिवंत बाहेर येण्याची शक्यता नव्हती. तरीही शिक्षा ऐकून ते डगमगले नाहीत. त्यांनी ब्रिटिश सरकारला ऐकवले. तुम्ही फार काळ भारतात राहू शकणार नाही. त्यामुळे माझी शिक्षा लवकर संपेल. इतका दुर्दम्य आत्मविश्वास फक्त तेच दाखवू शकतात. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात गेल्यावर त्यांची कठोर बारीशी गाठ पडली, शारीरिक-मानसिक यातनांना सुरुवात झाली. दिलेल्या भांड्यात संडास करावी लागे. स्वतःच्या कोठडीत लघुशंका केल्यावर त्याचा वास घुमत राही. इतकी भयंकर प्रतिकूलता असूनही ते हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत होते. जगताना आपल्यावर संकटे येऊ शकतात आणि आपण त्यांवर मात करू शकतो हे शिकायचं असेल तर *'माझी जन्मठेप'* वाचायलाच हवे. क्रांतिकारकांनी जे भोगले त्या तुलनेत आपल्या वाट्याला जर काही प्रतिकूल परिस्थिती आली तर ती काहीच नाही हे जाणवू लागते.
जगायला शिकवणाऱ्या पुस्तकांची अनेक उदाहरणे आहेत. त्यातील मी वाचलेलं एक आहे *डेझर्टर!* गंथर बाहनमन हा जर्मन सैनिक होता. त्याची लिबियामध्ये नेमणूक झाली होती. हिटलरसाठी तो लढत असताना त्याच्या वडिलांना नाझी सैनिकांनी फासावर चढवले. म्हणून त्याने सैन्य सोडण्याचे ठरवले. जर्मनीला जाऊन आईला भेटायचे त्याचे स्वप्न होते. पण त्याचा प्रवास सोपा नव्हता. सैन्यातून पळाल्यामुळे त्याला ठार केले जाऊ शकत होते. तरीही तो जर्मन आणि त्यांचे दोस्त असलेल्या इटालियन सैन्याला झुकांड्या देत पळत राहिला आणि अखेर शत्रूच्या म्हणजे ब्रिटिशांच्या तावडीत सापडला. ब्रिटिशांच्या कैदेत असताना तो इंग्लिश शिकला आणि त्याने हे पुस्तक लिहिले.
विजय देवधरांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद केला. त्यापैकी बरीच पुस्तके साहसावर आधारित आहेत. ही सगळी पुस्तके आपल्याला धाडस करायला उद्युक्त करतात. रवींद्र गुर्जरांनी अनुवादित केलेल्या *'सत्तर दिवस'* पुस्तकाचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. एक विमान दुर्गम पर्वतामध्ये कोसळले आणि त्यात जिवंत राहिलेल्या प्रवाशांनी जगण्यासाठी जी धडपड केली, ती ह्या पुस्तकात दिली आहे. ह्या प्रवाशांनी बर्फाळ प्रदेशात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी मेलेल्या सहप्रवाशांचे मास कापून खाल्ले. अखेरीस त्यांचा शोध लागला आणि त्यांची सुटका झाली. ज्यांना जीवनात अपयश आल्यामुळे आत्महत्या करावीशी वाटते त्यांनी जगण्याचा टोकाचा प्रयत्न कसा असतो हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे. ही सत्यकथा आपल्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही जगण्याची प्रेरणा देतं. जगण्यासाठी अनेकांची कशी धडपड चालते हे जाणून घ्यायचे तर *'मला निसटले पाहिजे'* हे पुस्तकही वाचावे. रशियाने काही ब्रिटिश सैनिकांना बंदी बनवले होते. ह्या सैनिकांनी पळून जाण्यासाठी जे प्रचंड धाडस केले तो ह्या पुस्तकाचा विषय आहे. कैदेतून पाळल्यावर हे सैनिक रशियापासून भारतापर्यंत चालत आले. इथे ब्रिटिशांची सत्ता होती. 
भारतात आल्यावर ब्रिटिश आपल्याला पुन्हा इंग्लंडला पाठवतील, हे ओळखून त्यांनी अत्यंत थंड प्रदेशातून उपास तापास सहन करून भारतापर्यंत चालत प्रवास केला. भारताच्या सीमेवर ते ब्रिटिश सैन्याकडे आले आणि त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माणूस प्रसंगी जीवावर उदार होतो, असंख्य अडथळे पार करतो हे या पुस्तकातून शिकता येते. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती बहुमोल आहे ते कळते. तसेच एक सैनिक देशासाठी किती झटत असतो तेही कळते.
भारतामध्येही अनेक चरित्रकथा लिहिल्या गेल्या. *'लंडनच्या आजीबाई'* हे पुस्तक त्यापैकी एक आहे. इंग्रजांच्या काळात विदर्भात राहणारी राधाबाई वनारसे ही विधवा दारिद्र्य भोगत होती. मुलींचं पोषण करणं अशक्य झालं होतं. ती दुसरा विवाह करून इंग्लंडला राहायला गेली. दुर्दैवाने दुसऱ्या पतीचेही निधन झाले. पुन्हा दारिद्र्य आले. इंग्लिश भाषा येत नव्हती. ती अशिक्षित होती. तरीही इंग्लंडमध्ये राहून तिने खानावळ चालवली आणि लंडनमध्ये चार इमारती विकत घेतल्या. पु. ल. देशपांडे, अत्रे, यशवंतराव चव्हाण लंडनला गेले की तिच्या खानावळीत जात असत. अत्रेंनी तर तिचे कौतुक करताना म्हटले की त्यांच्यामुळे लंडनही महाराष्ट्राचा भाग व्हायला पाहिजे. हे पुस्तक वाचकाला आशावादी बनवते, संघर्ष करण्याची प्रेरणा देते. कितीही संकटे आली तरी श्रम करून संकटे दूर करता येतात, यश मिळवता येते, हे या पुस्तकातून शिकता येते.
काही पुस्तके जगायला शिकवतात तर काही पुस्तके का जगायचं हे शिकवतात. जीवनातील विसंगतीकडे पाहून हसता येते हे पु. ल. देशपांडेंची पुस्तके शिकवतात आणि असे दिलखुलास हसता येते हाच जीवनातील मोठा आनंद आहे हे या पुस्तकातून कळते. "चाराणे खाल्ले तर चौकटीची टोपी घालून डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि लाखो रुपये खाल्ले तर लोकनियुक्त प्रतिनिधी बनवतात'' हा त्यांचा विनोद अनेक वर्षे उलटली तरी अजूनही खरा ठरतो. ''असा मी असामी'' आजही सामान्य माणसाचे प्रतिबिंब आहे. आचार्य अत्र्यांची पुस्तकेही अशीच हसवतात. द. मा. मिरासदार, रमेश मंत्री यांचीही पुस्तके करमणूक करतात. शं. ना. नवरे, व. पु. काळे छोट्या कथेमधून खूप काही सांगून जातात. व्यंकटेश माडगूळकर आणि रवींद्र पिंगे ह्यांचे ललित लेख तर फार वाचनीय असतात. माडगूळकरांनी त्यांच्या गावाचे खुमासदार वर्णन केले आहे आणि पिंगेंनी स्वतः केलेल्या भटकंतीवर विपुल लेखन केले आहे. हे लेखन आपल्याला आसपास पाहायला प्रवृत्त करते. जीवन चहूबाजूने खूप काही दाखवत असते. आपण आपल्या छोट्या समस्या, रोजचे रडे बाजूला सारून हा आनंद घ्यायला हवा हे त्यांची पुस्तके शिकवतात.

कथा, चरित्रकथा अनेक शब्दातून व्यक्त होतात. पण कविता मोजक्या शब्दातून खूप मोठा अर्थ सांगून जाते. आशावाद, सकारात्मकता कशी असावी हे मंगेश पाडगावकरांच्या *'या जन्मावर, या जगण्यावर'* च्या शेवटच्या कडव्यातून शिकता येते. पाडगावकरांनी लिहिले आहे,
या ओठानी चिंबून घेईन हजारदा ही माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी...
इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे,
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...
आपण जगताना अनंत यातना सोसतो. प्रसंगी मरणही झेलून घेतो. तरीही पाडगावकर लिहितात की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण पुरामध्ये पिंपळ पानावरुन तरून गेला तसे हे विश्वही तरणार आहे. आसपास अनेक नकारात्मक प्रसंग घडताना हा आशावाद मनाला खूप उभारी देतो. आपल्या मनाला उभारी देण्यासाठी आणखी एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या पाठीशी उभं राहणं. एखाद्याने नुसता धीर दिला तरी मोठ्या संकटांवर मात करता येते. कुसुमाग्रजांची *"कणा"* कविता हेच शिकवते. कुसुमाग्रजांकडे त्यांचा एक विद्यार्थी आला आहे. त्याच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे त्याचं घर उध्वस्त झाले आहे. तो येतो आणि म्हणतो,
*"ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,*
*कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.*
*क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,*
*‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.*
त्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं. पण त्या पाण्याला नाव न ठेवता तो त्याला गंगामाई म्हणतो आणि पुढे सांगू लागतो.
*"माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,*
*मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.*
*भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,*
*प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.*
*कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे,*
*पडकी भिंत बांधतो आहे,* *चिखलगाळ काढतो आहे"*
कुसुमाग्रजांनी त्याला मदत म्हणून काही पैसे देण्याचा विचार केला. पण त्याने ते नाकारले. कुसुमाग्रज लिहितात,
*खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,*
*‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.*
*मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,*
*पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!*
पूरग्रस्त झालेला हा विद्यार्थी खूप मानी आहे. त्याला पैसे नकोत, फक्त सरांकडून धीर हवा आहे. स

रानी पाठीवर हात ठेवून फक्त लढा म्हणावे इतकीच त्याची इच्छा आहे!! कुसुमाग्रजांची ही कविता अनेकांच्या स्मरणात राहिली ती फक्त हव्या असलेल्या धीरासाठी!

मराठी पुस्तकांची ही खासियत आहे. ही पुस्तके जगायला बळ देतात. जणू पाठीवरती हात ठेवून लढ म्हणत असतात. म्हणून आपल्या संग्रही पुस्तके असावीत. आपल्या पुढच्या पिढीला संपत्ती देण्यापेक्षा पुस्तके द्यावीत. कारण संपत्ती मिळालेली पिढी पंगू होते तर पुस्तके मिळालेली पिढी सक्षम बनते. पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणारी पाब्लो नेरुडाची कविता आहे,
If you do not travel,
If you do not read,
If you do not listen to the sounds of life,
You start dying slowly
जर तुम्ही प्रवास करत नसाल, पुस्तक वाचत नसाल, जीवनाचे रंग अनुभवत नसाल तर तुम्ही हळूहळू मरत आहात....

Copy/peaste
Credit to writer.

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

Top 5 4G Mobile Phones Under RS 5000

In the world as well as in the india mobile users are increasing continuously. Everyone are looking for best feature and under budget price mobile to buy. Then I have come bring some best top 5 4G mobile phones under RS 5000 under your budget. Let's see now.

 Top 5 4G Mobile Phones Under RS 5000.


Xifo Ken S9 4G Smartphone (2GB RAM, 16GB Storage) in Gold in 5.2 inch Touchscreen.




Samsung Galaxy M01 Core (Blue, 1GB RAM, 16GB Storage).




Xifo Wizphone WP3 4G (2GB RAM, 16GB Storage) Black.



Panasonic Eluga i7 (2GB RAM, 16GB Storage, Finger Print Sensor, 4000mAh Battery) (Black).


Thus Top 5 4G Mobile Phones Under RS 5000. Your Under budget phones I will bring for you.
Thank you.












मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

Thought on Determination.

🙏🌺॥प्रबोधन॥🌺🙏



●दृढनिश्चयाने भाग्य लाभते●


भाग्यकरितां संकल्प करावे । 
दृढनिश्चया वाढवीत जावें । 
तैसेचि प्रयत्न करीत राहावें ।
आळस सांडोनि ॥

जेवढा करावा उच्च विचार । 
तेवढाचि उच्च ठेवावा व्यवहार । 
त्यानेंच पावतें भाग्य थोर ।
सकळ योजना साधतां ॥


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज



{जर भाग्यवान व्हायचे असेल तर त्याकरिता संकल्प केला पाहिजे. दृढनिश्चयाने तो संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आळस सोडून उच्च विचार  व उच्च आचार ठेवल्यास थोर भाग्य लाभेल जेणेकरून सर्व योजना, संकल्प पूर्ण होतील.}